in ,

‘एनसीबीने आर्यन खानला सुपर डुपर स्टार बनवलं’; राम गोपाल वर्मांचं टि्वट

राम गोपाल वर्मा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. ट्विटरवरून ते वेगवेगळ्या मुद्दयांवर आपले मत व्यक्त करत असतात. नुकतंच राम गोपाल वर्मा यांनी आर्यनविरोधातील ड्रग्स प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे आणि या ट्वीटमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आर्यन खानवर लावण्यात आलेल्या आरोपांमधून काहीही निष्पन्न होणार नाही, असं त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

एनसीबीने गेल्या आठवड्यात मुंबईतील क्रूझवर सुरु असलेल्या पार्टीवर छापे टाकले होते. यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि काही जणांना अटक करण्यात आले. यावर आता फिल्ममेकर राम गोपाल वर्मांनी ट्वीट करत एनसीबीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. यात ते म्हणाले,’शाहरुख खानच्या हुशार आणि खऱ्या चाहत्यांनी खरं तर एनसीबीचे आभार मानले पाहिजेत. कारण त्यांनी सुपरस्टारच्या मुलाला सुपर डुपर स्टार बनवलं आहे. शाहरुखचा एक सच्चा चाहता म्हणून मला फक्त जय एनसीबी असा नारा द्यावा वाटतोय.’असं राम गोपाल वर्मा त्यांच्या ट्वीट मध्ये म्हणाले आहेत. यात त्यांनी एनसीबीने आर्यन खानला सुपरस्टार बनवल्याचं म्हणत चिमटे काढले आहेत.

एनसीबीनेच शाहरुख खानच्या आधी त्याच्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला लॉन्च केलं असं राम गोपाल वर्मा त्यांच्या एका ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. आर्यन खानवर जर सिनेमा निघाला तर त्याचं नाव ‘रॉकेट’ असेल आणि हिरो म्हणून आर्यन खान त्यात मुख्य भूमिकेत झळकेल असं ते म्हणाले आहेत. शिवाय या सिनेमाची निर्मिती एनसीबी करेल आणि काही राजकीय नेते सह-निर्माते असतील असं म्हणत त्यांनी एनसीबीसह राजकिय नेते आणि मीडियावर निशाणा साधला आहे.

“स्वतःच्या वडिलांपेक्षा तुरुंगात आणि एनसीबी कडून आयुष्याबद्दल जास्त शिकायला मिळालं हे आर्यन खान भविष्यात म्हणेल अशी मी पैज लावतो.” असं राम गोपाल वर्मा म्हणाले. तसचं एका ट्वीटमध्ये आर्यन खानवरील आरोपांमधून काहीही निष्पन्न होणार नाही असं ते म्हणाले आहेत. “एजन्सीसह प्रत्येकाला माहिती आहे की आर्यन खानवर लावलेल्या आरोपांमधून काहीही निष्पन्न होणार नाही. निकालात विलंब करण्यासाठी सर्व युक्त्या वापरून झाल्यानंतर तो नक्कीच बाहेर येईल.” असंही ते म्हणाले आहेत.

आर्यन खानला जेलमध्ये वाईट परिस्थितीचा सामना करावा लागत असेल, अशी अनेकांकडून वक्तव्यं केली जात आहेत. यावरदेखील राम गोपाल वर्मांनी मत मांडलं. शाहरुख खानला सुपरस्टार होण्यासाठी ज्या संघर्षाचा आणि परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. जेलमध्ये आर्यनला नक्कीच तेवढ्या वाईट परिस्थितीचा सामना कराना लागत नसेल, असं ते म्हणाले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भोसरी जमीन गैरव्यवहार : एकनाथ खडसेंच्या पत्नीला उच्च न्यायालयाचा दिलासा

‘इटर्नल्स’ कोण आहेत? Avengers पेक्षा अधिक शक्तिशाली आहेत का? भेटा पृथ्वीच्या महान सुपरहीरोंना!