सध्या मुंबईत अमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी मोहिम सुरु करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एनसीबीकडून मुंबईत एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. वर्सोवा,मीरा रोड,लोखंडवला येथे छापेमारी झाली. या छापेमारीमध्ये ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या बाप-लेकाला अटक करण्यात आली आहे. फारुख बटाटा आणि शादाब बटाटा अशी दोघांची नावे आहेत. रात्री उशिरा मुंबईत तीन ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कायवाईमध्ये 2 करोड रुपये किंमतीचं MD ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. आरोपी असलेला विद्यार्थ्यावर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी ना तो ड्रग्ज पुरवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. न्यायालयानं आरोपीला ४ दिवसांची NCB कस्टडी सुनावली आहे.
Comments
Loading…