in

NCBचं पथक उद्या मुंबईत, समीर वानखेडेची चौकशी होणार

मुंबई क्रुझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आज एनसीबी अधिकाऱ्याने निनावी पत्र नवाब मलिकांना पाठवले होतेय. या संदर्भात चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एनसीबी अधिकाऱ्याचे निनावी पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिल्लीतील एनसीबीच्या महासंचालकाना पाठवले आहे. एनसीबीकडून सुरू असलेल्या तपासाबाबत या पत्रात माहिती आहे. त्यामुळे आपण याबाबत योग्य ती कारवाई करावी असे नवाब मलिक यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने पाठवलेल्या पत्रात समीर वानखेडे आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे खोटे प्रकरण केली तसेच खोट्या केसेस टाकून लोकांना अडकवलं जात असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान मलिक यांनी या निनावी पत्रासह एनसीबीच्या महासंचालकांकडे तक्रार केली आहे.

पाच अधिकाऱ्यांचे विशेष पथक मुंबईत दाखल होणार आहेत. डेप्युटी जनरल डायरेक्टरचे मुख्य दक्षता अधिकारी ज्ञानेश्वर सिंह स्वतः उद्या मुंबईला जाणार आहेत. मुंबईत येऊन समीर वानखेडे यांची उद्या पुन्हा चौकशी होणार आहे. पंच प्रभाकर साहिलकडेही पथक चौकशी करणार आहेत. त्यामुळे या चौकशीकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

हाताची बोट तोडून चोरल्या अंगठ्या, हत्या, चोरीचा केला 24 तासांत उलगडा

घराचं स्वप्न पुर्ण होणार! ‘ही’ बँक देणार स्वस्तात गृहकर्ज