in

Sameer Wankhade | एनसीबीच्या समीर वानखेडेंवर पाळत; धनंजय मुंडे म्हणाले…

उमाकांत अहिरराव, धुळे | बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याविरोधातील कारवाईमुळे केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या चर्चेत आहेत. दरम्यान समीर वानखेडे यांच्यावर मुंबई पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार एनसीबीकडून करण्यात आली आहे. या प्रकरणावर आता सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

समीर वानखेडे यांच्यावर मुंबई पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार एनसीबीकडून करण्यात आली आहे. याप्रकरणी वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांची सोमवारी भेट घेतली व दोन पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार केली. दरम्यान यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

आर्यन खान प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीचा महाराष्ट्र पोलीस योग्य तपास करतील असं सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केला आहे. वानखेडे यांच्यावर पाळत ठेवली जात असेल तर त्याबाबत पोलीस योग्य तपास करतील अशी असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री दौऱ्यावर आले असताना माध्यमांशी ते बोलत होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गोवंडीतून पोलिसांनी केले ड्रग्स जप्त

ओबीसी आरक्षणाबाबत कोण खोटे बोलतय, हे जनता जाणून- धनंजय मुंडे