in

भंडारा : महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर, भंडारा-तुमसर महामार्ग रोखला

केंद्र सरकारच्या धोरणांवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून भंडाऱ्यात केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढ आणि महागाईच्या आज राष्ट्रवादी काँग्रेसने मोहाडीत भंडारा-तुमसर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून मोदी सरकारच्याविरोधात निदर्शने केली. यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती.

केंद्र सरकारच्या अन्यायकारी धोरणाचा निषेध व विरोध करण्यासाठी व गॅस दरवाढ कमी करणे, पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करणे, खाद्य तेल व जलाऊ लाकडाचे भाव कमी करणे, धानाचे हमी भाव २५०० रुपये प्रति क्विंटल करणे, शेतकऱ्यांना शेती उपयोगी यंत्रसामुग्री तीन टक्के राष्ट्रीयकृत बँकांकडून यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यात यावे, या मागणीला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने आज मोहाडी येथील बसस्थानक चौकात एक दिवसीय धरणे व चक्का जाम आंदोलन केले.

आंदोलना दरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आले.मोदी सरकार वर या वेळी ताशेरे ओळण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.या वेळी शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“संजय राठोड यांना क्लिन चीट देण्याचा संबंधच नाही”

जळगावात मिनी प्लेन कोसळल्याची घटना; दोघांचा मृत्‍यू