in

इंधनाच्या वाढत्या दरांवरून नवाब मलिक यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

मेरे नशीबसे दाम कम हो रहे है असं बोलणारे मोदीजी आता कुणाच्या नशीबाने भाव वाढत आहेत. तुमच्या नशीबाने की जनतेच्या नशीबाने…कोण बदनशीब आहे. देशातील जनता की तुम्ही? याचं उत्तर मोदींनी द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

आजच्या दिवशी पेट्रोल व डिझेल आणि सीएनजी, एलपीजी यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

देशात पेट्रोल – डिझेलच्या मुद्दयावर भाजपने निवडणूक लढवली. अब की बार मोदी सरकार बोलत सत्तेवर आल्यानंतर काही काळात भाव कमी केले.दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोदींनी मेरे नशीबसे दाम कम हो रहे है तो विपक्ष को क्यू बुरा लगता है, आपको नशीबवाला चाहिए की बद नशीबवाला चाहिए, असे बोलून मोदींनी विरोधकांना डिवचले होते. दरम्यान, हाच मुद्दा पकडून नवाब मलिक यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मोदी संबोधणार जे. पी. नड्डा पक्षाच्या केंद्रीय दलाची बैठक

मुंबई-आग्रा महामार्गावर खर्डी जवळ अपघात, 5 जण गंभीर जखमी