लोकशाही न्यूज नेटवर्क
विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने केरळमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला आता केरळमध्ये फटका बसला आहे. पाला विधानसभा मंतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार मणी सी कप्पन यांनी पत्राला सोडचिठ्ठी देऊन शेकडो कार्यकर्त्यांसह यूडीएफमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादीने कप्पन यांच्यावर कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार आता आमदार कप्पन यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे.
यासंबंधी अधिकृत पत्र राष्ट्रवादीकडून देण्यात आले आहे. पक्षाच्या विरोधात काम केल्यामुळे पक्षप्रमुख शरद पवार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे. राष्ट्रवादीचे कार्यकारी समितीचे सदस्य आणि सचिव एस.आर कोहली यांनी हे पत्र जारी केले आहे.
Comments
Loading…