in

‘Maratha Reservation साठी पंतप्रधानांना पाठवणार एक कोटी पत्रं‘ राष्ट्रवादी युवकची नवीन मोहीम

मराठा आरक्षणप्रश्नावर राज्यसरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात आता राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने 22 व्या वर्धापण दिनानिमित्त नवीन मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेनुसार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक कोटी पत्रं पाठवण्यात येणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ नवी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक कोटी पत्रं पाठवणार असून मराठा आरक्षण देण्याची मागणी करणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजपर्यंत सर्व घटकांचा विचार केला आहे आणि करत आहे. हाच धागा पकडत व पक्षाचा विचार लक्षात घेऊन वर्धापन दिनी ही मोहीम राज्यभर राबविली जात आहे. त्यामुळे आपण सुद्धा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक पत्र लिहावे, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चंद्रपूरमध्ये वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ

कोल्हापुरात उभारलं लहान मुलांचे पहिले कोविड सेंटर