in

ठेकेदाराचा हलगर्जीपणा; तीन तालुक्यांचा संपर्क तुटला

यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे एका ठेकेदाराने अर्धवट सोडलेल्या कामांचा फटका तीन तालुक्यांना बसला आहे. तसेच तब्बल चार तासापासून वाहतूक खोळंबली होती.

महागाव तालुक्यातील गुंज बस स्थानकावरील प्रगतीपथावर असलेल्या पुलाचे काम सबंधित ठेकेदाराने अर्धवट सोडून दिले होते. त्यामुळे सकाळपासून संतधार कोसळणाऱ्या पावसाने तीन महागाव, पुसद, माहूर या तालुक्याचा संपर्क तुटला असून तब्बल चार तासापासून वाहतूक खोळंबली होती. दरम्यान अर्धवट पुलाच्या कामाने पुलानजीक असलेल्या दुकान आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचीही घटना घडली आहे. यामुळे अनेकांच्या घराचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

गुंज येथील पुलाच्या अर्धवट कामाने पावसाळ्यात मोठे नुकसान होण्याची शक्यता असलेली तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती. मात्र संबंधित प्रशासनाने तक्रारीची दखलचं न घेल्याने आता ठेकेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप केला जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मराठा आरक्षण | मूक मोर्चाचा एल्गार, “आता आमदार-खासदार बोलतील!”

वाशिम जिल्ह्यात धुवादार पाऊस