in

…जुमलाजीवी नहीं, पंतप्रधानांच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांचे प्रत्युत्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क | राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हटले होते. यानंतर त्यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरावरून विरोध करण्यात आला होता. त्यात आता ट्विटरवर आंदोलनजीवी हूँ जुमलाजीवी नहीं असा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.

नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना ‘आंदोलन मागे घ्या आणि चर्चेस या’, असे आवाहन केले होते. त्याचबरोबर आंदोलनजीवी म्हणजे व्यावसायिक आंदोलक उदयास आले असून तेच सर्व आंदोलनांमध्ये दिसत आहेत. हे परोपजीवी आंदोलक प्रत्येक आंदोलनावर पोसले जात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली होती.

मोदींच्या या टिकेनंतर शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्यानी ट्विटरवर आंदोलनजीवी हूँ जुमलाजीवी नहीं असा हॅशटॅग ट्रेण्ड करून ट्विट केले आहे. या हॅशटॅगवर आतापर्यत ६० हजारांहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत.

जुमला शब्द…

परदेशातील काळापैसा भारतात आणला तर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करता येतील हा निवडणुकीच्या प्रचारामधील जुमला म्हणजेच खोटं आश्वासन होतं असं शाह यांनी ५ फेब्रुवारी २०१५ रोजी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर हा शब्द चर्चेत आला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी १००० कोटींचा निधी जमा

उद्योजक अविनाश भोसलेंच्या कार्यालयावर ईडीचा छापा