राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांची संख्या 35 हजारांच्या पुढेच राहिली. कालच्या तुलनेत आज दिवसभरात रुग्णसंख्येत हजाराने वाढ नोंदवली गेली. ही वाढती संख्या लक्षात घेऊनच राज्य शासनाने रविवारपासून राज्यात रात्रीची जमावबंदी लागू केली आहे.
ज्यात गेल्या 24 तासांत 36 हजार 902 नव्या रुग्णांचे निदान झाले. आतापर्यंत प्रयोगशाळेत 1 कोटी 90 लाख 35 हजार 439 नमुन्यांपैकी 26 लाख 37 हजार 735 नमने (13.86 टक्के) पॉझिटिव्ह आढळले. राज्यात सध्या 2 लाख 82 हजार 451 अॅक्टिव्ह केसेस आहेत. सध्या राज्यात 14 लाख 29 हजार 998 जण होमक्वारंटाइन तर, 14 हजार 578 जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन आहेत.
दिवसभरात 17 हजार 19 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात 23 लाख 56 जण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 87.2 टक्के आहे. दिवसभरात 112 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 53 हजार 907 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर 2.4 टक्के आहे.
Comments
Loading…