in ,

नागपूरकरांवर लॉकडाउन सारखे नवे निर्बंध…

विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे, त्यामुळे काही जिल्ह्यात संचारबंदी अथवा लॉकडाऊन करण्यात आला आहे. आता नागपूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही निर्बंध घालण्यात आले आहेत.

विदर्भातील यवतमाळ, अमरावतीमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. त्यामुळे पुन्हा संचारबंदी, लॉकडाउन सारखे निर्बंध लागू केले आहेत. आता नागपूर गंभीर रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

मंगळवारी शहरात दिवसभरात ५५१, ग्रामीणला १३८ असे एकूण ६९१ रुग्णांची भर पडली. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या १ लाख १५ हजार ४२०, ग्रामीण २८ हजार १८४, जिल्ह्याबाहेरील ९३० अशी एकूण १ लाख ३३ हजार ७७५ रुग्णांवर पोहोचली.या सर्व वाढत्या रुग्णसंख्येमुळे महानगरपालिकेनेही कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

‘या’ गोष्टीवर बंदी

  • बाजारपेठा व दुकाने दर शनिवार-रविवार पुढील आदेशापर्यंत बंद.
  • रेस्टॉरेन्ट, हॉटेल दर शनिवारी-रविवारी पुढील आदेशापर्यंत बंद.
  • रेस्टॉरेन्ट, हॉटेल बंद राहणार असले, तरी हॉटेल्सची खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवण्याची ऑनलाइन सेवा सुरु राहील.
  • शहरातील जलतरण तलाव व वाचनालय उद्यापासून ७ मार्च पर्यंत बंद राहतील.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

West Bangal Election: क्रिकेटर मनोज तिवारीची नवी इनिंग; तृणमूल काँग्रेसमध्ये केला प्रवेश

यापुढे मंत्रालयात कर्मचाऱ्यांची 50 टक्केच उपस्थिती, ‘अशी’ असेल व्यवस्था