लोकशाही न्यूज नेटवर्क | येत्या 19 फेब्रुवारी रोजी राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. यंदाची जयंती साधेपणाने साजरी करावी अशा सुचना देत राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. याआधी भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेत नव्याने नियमावली जाहीर केली आहे.
कोरोनाचा प्रसार कमी झाला असला तरी संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने जयंती साजरी साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार आधी फक्त १० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र या निर्णयाला भाजपाने विरोध दर्शवाल्यानंतर राज्य सरकारने एक पाऊल मागे घेत नव्याने नियमावली जाहीर केली. पण आता १०० जणांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अशी असेल नियमावली
- कोविड- 19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.
- सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मनाई असेल.
- जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे असल्यास केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण करावे
- प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यास मनाई असणार आहे.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी
- जयंतीची निमित्तच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त 100 व्यक्तींनाच उपस्थिती राहता येणार आहे.
- शिवजयंतीनिमित्त आरोग्य शिबिरे (रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. तसेच सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
Comments
Loading…