कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच भाविकांना साईंचं दर्शन घेता येणार आहे. पहाटेची काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीला भक्तांना उपस्थित राहाता येणार नाही. गुरुवार आणि सलग सुट्टीच्या दिवशी भक्तांना ऑनलाईन पास बंधनकारक आहे. तर गुरुवारी होणारा साईपालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे.
अशी असणार नियमावली
- दर्शनाची वेळ सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहे. 2. सकाळची काकड आरती आणि रात्रीची शेज आरती भक्तगणांसाठी खुली असणार आहे.
- मुख दर्शन सुविधा फक्त या कालावधीत कोविड मार्गदर्शक तत्वे अनुसुरून चालू ठेवण्यात येणार आहे.
- गुरुवारची पालखी व्यवस्था देखील या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आली आहे.
- बायोमेट्रिक पास काऊंटरवर होत असलेल्या गर्दी पाहता गुरूवार, शनिवार, रविवार तसेच उत्सवाचे दिवस बायोमेट्रिक पास काऊंटर बंद करण्यात आले आहे. ऑनलाईन दर्शन पास व्यवस्था चालू असणार आहे.
- भक्तांची दर्शन रांगेत ढोबळ चीचणी करण्यात येणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी 150 तर गुरूवार, शनिवार आणि रविवारी 200 जणांची चाचणी घेण्यात येणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी शिर्डी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी ग्रामस्थ आणि भाविकांना समज देण्यासाठी मास्क वाटप करत जनजागृती केली. विना मास्क आढळल्यास एक हजार रुपये तर सार्वजनिक जागी थुंकल्यास पाच हजार रुपये दंड आकारणी करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिली आहे.
Comments
Loading…