in

Vaze Controversy : सचिन वाझेंनी फेकलेले पुरावे शोधण्यासाठी मिठी नदीत ‘सर्च ऑपरेशन’ महत्वाचे पुरावे हाती

राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून मिठी नदीत सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. यामध्ये संपूर्ण प्रकरणासंदर्भात महत्वाचे पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन यांच्या हत्येत सहभाग असल्याचे पुरावे तपास यंत्रणांपासून पडताळण्याचे काम सुरू आहे.

मिठी नदीतून काढलेल्या पुराव्यांमध्ये कही नंबर प्लेट सापडल्या असून याचसोबत विविध डिव्हिआर आणि संगणकाचे सीपीयू सापडले आहेत. या प्रकरणात कोणते लोक गुंतले आहेत, त्यांचीही माहिती या तपशीलातून समोर येऊ शकते.

याआधी एसटीएसचे प्रमुख जयजित सिंग यांनी पत्रकार परिषद घेत या हत्येतील पुरावे नष्ट करण्यात आल्याचे सांगितले. याचाच तपास एनआयए करत आहे. या संपूर्ण कटात चारचाकी गाड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सर्वच गोष्टी सार्वजनिक होत नाहीत – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

इंडोनेशिया | चर्चसमोर भयंकर बॉम्बस्फोट