in ,

सोलापुरात 7 मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी!

सोलापूर- संजय पवार | कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता सोलापूर शहर व जिल्ह्यात आज 24 फेब्रुवारीपासून ते 7 मार्चपर्यंत रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.

याशिवाय 7 मार्चपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

पालकमंत्री काय म्हणाले? :

  • आजपासून 7 मार्चपर्यंत रात्री कडक संचारबंदी.
  • आज मध्यरात्रीपासून रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी.
  • शहर आणि जिल्ह्यातील टेस्टींग वाढविणार. शाळा-महाविद्यालय 7 मार्चपर्यंत बंद राहणार.
  • 10 वी आणि 12 चे वर्ग सुरु राहणार.
  • क्रिडांगणावर 7 मार्चपर्यंत कोणत्याही क्रिडा स्पर्धा भरवण्यास बंदी.
  • लग्नसमारंभासाठी 50 लोकांची मर्यादा.
  • कोव्हिड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हिड सेंटर वाढविणार.
  • कर्नाटकातून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

यापुढे मंत्रालयात कर्मचाऱ्यांची 50 टक्केच उपस्थिती, ‘अशी’ असेल व्यवस्था

पालघरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव; चिकन विक्रीस बंदी