लोकशाही न्यूज नेटवर्क
पुण्याच्या ‘शक्ती’ मृत्यू प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटू लागले आहेत. याच्या सखोल चौकशीची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टीका केली आहे.
मुळची परळीची असलेली 22 वर्षाची ‘शक्ती’ शिक्षणासाठी पुण्यात आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री 1च्या सुमारास तिने हेवन पार्कमधील तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच वाटेतच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा एका बड्या नेत्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली.
याबाबत निलेश राणे यांनी ट्विटरवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘पुण्यातील तरुणीच्या आत्महत्येमागे ठाकरे सरकारमधील एक मंत्री जबाबदार असल्याची चर्चा आहे. ‘तुरुंग पर्यटन’ या सरकारने सुरू केलं आहे, असं कुठेतरी वाचण्यात आलं; पण एकाच इमारतीमध्ये गुन्हेगार पर्यटन सुरू करायचं असेल तर, मंत्रालय सध्या एक नंबरवर आहे,’ अशी टीका त्यांनी केली आहे.
Comments
Loading…