in ,

“अजित पवार मराठवाडा-विदर्भाच्या दौऱ्यावर आल्यावर दगड मारून स्वागत करायला पाहिजे” – निलेश राणे

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवार पासून सुरुवात झाली यामध्ये वैधानिक विकास महामंडळाची घोषणा न करण्यावरून भाजपानं ठाकरे सरकार हल्लाबोल केला. त्याला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. अजित पवार यांनी दिलेल्या उत्तरावरून आता माजी खासदार निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. “१२ आमदार आणि विकास महामंडळाचा काय संबंध??,” असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.

विदर्भ आणि मराठवाड्याच्या वाट्याचा एकही रुपया कमी न करता निधीचे संपूर्ण वाटप करण्यात येईल. राज्यपालांकडे प्रलंबित असलेली विधान परिषदेच्या १२ आमदारांची नियुक्ती झाली की, दुसऱ्या दिवशी वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ दिली जाईल,” असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केले होतं. त्यावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला होता.

या मुद्द्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. “१२ आमदार जाहीर होतील, तेव्हा वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ देऊ असं काल अजित पवार म्हणाले. मराठवाडा-विदर्भातील जनतेचा हा अपमान आहे. अजित पवार मराठवाडा-विदर्भात आले, तर त्यांचं स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केला पाहिजे. १२ आमदार आणि विकास महामंडळाचा काय संबंध??,” असं टीकास्त्र निलेश राणे यांनी अजित पवारांवर सोडले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वाढीव वीज बील प्रश्नावरुन भाजप नेत्यांचं आंदोलन

प्रवाशांना आपत्कालिन स्थितीची तात्काळ माहिती मिळणार!