in

पॉर्न फिल्म रॅकेट : सूरतमधून एकाला अटक, आणखी नावे समोर येण्याची शक्यता

लोकशाही न्यूज नेटवर्क

टीव्ही, चित्रपट या क्षेत्रामध्ये पदार्पण करू इच्छिणाऱ्या काम देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या अश्लील व्हिडीओचे शूटिंग करणारे एक रॅकेट मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने नुकतेच उद्ध्वस्त केले. याप्रकरणी 9 जणांना गजाआड करण्यात आले असून त्यातील एकाला सूरतहून अटक करण्यात आले आहे. त्यामुळे हे जाळे कुठपर्यंत पसरले आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.

मड आयलँड परिसरातील काही बंगल्यांमध्ये फिल्म शूटिंगच्या नावावर वेश्या व्यवसाय चालतो आणि शॉर्ट पॉर्न व्हिडिओ तयार करण्यात येतात, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापेमारी केली. याप्रकरणी टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल गहना वशिष्ठला मुंबई क्राइम ब्रँचने शनिवार रात्री अटक केली होती. तिच्या व्यतिरिक्त अन्य आठ जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली. उमेश कामत, दिपांकर खासनवीस ऊर्फ शान बॅनर्जी, तनवीर हाश्मी, यास्मिन रसूल बेग खान ऊर्फ रुवा, प्रतिभा विक्रम नलावडे, मोनू गोपालदास जोशी, भानू ठाकूर, मोहंमद आतिफ नसिर अहमद अशी त्यांची नावे आहेत यापैकी 5 जणांची न्यायालयीन कोठडी तर, चौघांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यातील तनवीर हाश्मी याला गुजरातमधील सुरत येथून अटक करण्यात आली आहे.

ज्या कंपनीच्या माध्यमातून पॉर्न फिल्म शूट केली जात होती त्या कंपनीचा तो संचालक दिपांकर खासनवीस उर्फ शान बॅनर्जी आहे. तसेच तो या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या एका महिलेचा पती असून, पेशाने तो फोटोग्राफर आहे. उमेश कामत याच्या एका बँक खात्यात व गहना वशिष्ठ हिच्या दोन बँक खात्यामध्ये परदेशातून हजारो डॉलर आले असल्याचा पोलिसांचा दावा आहे. हे पैसे आल्यानंतर त्याचे वाटप केले जात असल्याचेही समोर आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CoronaVirus : राज्यात आढळले नवे साडेतीन हजार रुग्ण, चिंता वाढली

वर्सोवा आग दुर्घटना; बेकायदेशीर सिलिंडर साठवल्याप्रकरणी एकाला अटक