राज्यात कोरोनाचा विस्फोट होत आहे.केंद्र सरकारकडून राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं जाहीर करण्यात आले आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. अशा परिस्थितीमध्ये शासकीय किंवा खासगी रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर बेड्स मिळत नाही आहेत.
मध्यंतरी कोरोना आटोक्यात आल्यानंतर राज्यातले अनेक कोविड सेंटर्स बंद करण्यात आले होते. परंतु सध्याची परिस्थिती पाहता त्यातले अनेक सेंटर्स पुन्हा कार्यान्वित करण्यात आलेत. दुसऱ्या लाटेत कोरोनाचा नवा स्ट्रेन देखील आढळून आलाय. नव्या कोरोनाचा आधीच्या कोरोनापेक्षा अधिक वेगानं प्रसार होतो. त्यामुळे कोरोनाचा विस्फोट झाल्यास कोरोनाबाधितांना वेळेवर बेड्स मिळतील का असा प्रश्नच निर्माण झाला आहे.
मार्च महिना सुरू झाल्यापासून राज्यात कोरोनानं धुमाकूळ घातला. मागच्या 24-25 दिवसांत राज्यात रेकॉर्डब्रेक कोरोनाबाधित आढळलेत. त्यामुळे अनेक शासकीय आणि खासगी रुग्णालये पूर्ण भरलेली आहेत. मुंबईतील लीलावती तसेच इतर अनेक रुग्णांना बेड्स मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बाधितांकडून अधिक शुल्क आकारल्याचा तक्रारीही पुन्हा एकदा समोर येऊ लागल्या आहेत.
मुंबईत कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. त्यामुळे महापालिकेच्या माहितीनुसार सद्यस्थितीत मुंबईत 13 हजार 773 बेड्स आहेत त्यापैकी 5 हजार 240 बेड्स रिक्त आहेत. यामध्ये 512 ICU बेड्स उपलब्ध
येत्या काळात बेड्सची संख्या 21 हजारांपर्यंत वाढवणार आहे. गेल्या महिनाभरात मुंबईतील कोरोना मृत्यूदर 4.6 टक्के होता.
दुसरीकडे पुण्यात शिवाजीनगर इथलं जम्बो कोविड सेंटर पुन्हा एकदा कार्यान्वित करण्याची वेळी आली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतेय. त्यामुळे उपचारासाठी रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही आहेत. राज्यातली कोरोनाबाधितांची वाढत असलेली संख्या आणि बेड्सची ही परिस्थिती पाहाता प्रशासनानं तात्काळ पाऊलं उचलून कोरोनाबाधितांना वेळत उपचार मिळवून देणं गरजेचं आहे.
Comments
Loading…