in

धारावीकरांनी पुन्हा करून दाखवलं; २४ तासांत एकाही कोरोना रुग्णाची नोंद नाही

मुंबईतील धारावी भागात आज एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही आहे. त्यामुळे धारावीकरांनी पुन्हा करून दाखवलं आहे. त्यामुळे ज्या शहरी भागांना जमलं नाही आहे ते धारावी सारख्या झोपडपट्टीतील नागरिकांनी करून दाखवल आहे.

मुंबईतील धारावी भागात गेल्या २४ तासांत एकाही नव्या कोरोना रुग्णाची नोंद झालेली नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेने सोमवारी याबाबत माहिती दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ८ एप्रिल रोजी धारावी येथे एकाच दिवसात सर्वाधिक ९९ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे पहिल्या लाटेत महापालिकेची चिंता वाढवलेल्या धारावीने दुसऱ्या लाटेला थोपवल्याचे चित्र आहे.

कोरोनाचा नवा एकही रुग्ण न आढळल्याने धारावीकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे. चार महिन्यानंतर पहिल्यांदा धारावीत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.धारावीतील एकूण रुग्णांची संख्या ६,८४४ पर्यंत पोहोचली आहे. तर ६,४६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीत २० रुग्ण सध्या उपचाराधीन आहेत. जी / उत्तर वॉर्डमधील करोनाबाधित रुग्णांची आकडेवारी मुंबई पालिकेने जाहीर केली. आलेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाईंदरमध्ये घरातील सिलिंगचा भाग कोसळल्याची घटना; एकाचा दुर्दैवी मृत्यू

केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झडती; दोन पीएसआयसह पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन