in

दमदार स्पेसिफिकेशन्ससह ‘हा’ स्मार्टफोन लाँच

नोकियाने आपला एक बजेट 5G Phone जागतिक बाजारात सादर केला आहे. Nokia G300 5G स्मार्टफोन अमेरिकेत लाँच करण्यात आला आहे.कंपनीने यामध्ये स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसर, 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Nokia G300 स्मार्टफोनची किंमत $200 म्हणजेच 15,073 रुपये आहे.

स्पेसिफिकेशन्स :

▪️ Nokia G300 5G मध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 16 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेन्सर मिळतो.

▪️ त्याचबरोबर 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी कंपनीने फ्रंटला 8 मेगापिक्सलचा शुटर दिला आहे.

▪️ या फोनमध्ये 4,470 एमएएचची दमदार बॅटरी मिळते, ही बॅटरी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 5.0, वाय-फाय, यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, एनएफसी आणि 3.5mm हेडफोन जॅक असे पर्याय देण्यात आले आहेत.

▪️ हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसरच्या प्रोसेसिंग पॉवरचा वापर करतो. त्याचबरोबर यात फोनमध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे.

▪️ हा मोबाईल Android 11 ऑपरेटिंग सिस्टमसह बाजारात आला आहे. यात 6.7 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक वी-नॉच आणि 20:9 अस्पेक्ट रेशियो असलेला डिस्प्ले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

College Reopen | येत्या 20 अ़ॉक्टोंबरपासून कॉलेज सूरू होणार – उदय सामंत

सत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे; शरद पवारांचा फडणवीसांना टोला