in

नोव्हाक जोकोव्हिचने कोरलं ऑस्ट्रेलियन ओपनवर नाव

‘मेलबर्न पार्कचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचने नव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले आहे.नऊ वेळा अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या जोकोव्हिचने एकदाही हार पत्करली नाही. जोकोव्हिच यानं मेदवेदेवचा 7-5 6-2 6-2 अशा फरकानं पराभव केला.

आज झालेल्या अंतिम फेरीत नोव्हाक जोकोव्हिचचा सामना डॅनिल मेदवेदेवशी होता. या सामन्यात जोकोव्हिचने डॅनिल मेदवेदेवचा 7-5 6-2 6-2 अशा फरकानं पराभव करत जतेपदावर नाव कोरलं आहे. तर जोकोव्हिचनं नवव्या ऑस्ट्रेलियन जेतेपद पटाकवलं आहे.

चौथ्या मानांकित मेदवेदेवने अलीकडे पॅरिस मास्टर्स, एटीपी फायनल्स आणि एटीपी चषक जिंकले आहेत. मेदवेदेव हा मरात सॅफिननंतर (२००५) ऑस्ट्रेलियन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा रशियाचा पहिला टेनिसपटू ठरला आहे.

अव्वल खेळाडूंविरुद्ध सहज विजय मिळवणाऱ्या मेदवेदेवने विजयाची मालिका अखंड राखली आहे. लंडनमध्ये मलाही त्याने सरळ सेटमध्ये पराभूत केले आहे. दमदार सव्‍‌र्हिस तसेच ताकदवान फोरहँड व बॅकहँड असलेल्या मेदवेदेने कामगिरीत प्रचंड सुधारणा केली असल्याचे नोव्हाक जोकोव्हिचने सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

फेसबुककडून म्यानमार लष्कराचे मुख्य पेज डिलीट

लस घेतल्यानंतरही उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटिव्ह