कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. परिणामी उद्यापासून सर्व राजकीय, शासकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी घालण्यात आले असून आता लग्न सोहळ्यांचे व्हिडिओ आता पोलिसांना पाठवणे बंधनकारक असणार आहे. ठाणे शहरात कोरोनाचा कहर पुन्हा वाढू लागल्यानं महापालिकेसह पोलीस प्रशासनही सतर्क झालं आहे.
शहरातील वाढत्या संसर्गाला आवर घालण्यासाठी पोलिसांनी आता लग्न सोहळ्यांवर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत येणाऱ्या सर्व शहरांमधील विवाह सोहळ्यात आता केवळ 50 जणांच्या उपस्थितीला पोलिसांची परवानगी असणार आहे. विशेष बाब म्हणजे लग्न सोहळ्याच्या एक व्हिडिओ शूट करून पोलिसांना पाठवावा लागणार आहे. यामध्ये नियमांचं उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्यांचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
लग्न सोहळ्यांना उपस्थित राहणाऱ्या सर्वांना मास्क लावणे गरजेचे आहे. लग्न समारंभासाठी लोकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे. 50 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्या, असं दिसल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शिवाय, संबंधित व्यवस्थापनावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दररोज किमान 5 लग्नाच्या सभागृह किंवा कार्यालयांवर धाडी टाकण्याचे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तिथे नियमांचं पालन होत नसल्यास आयोजकांसह कार्यालय व्यवस्थापनावरही गुन्हे दाखल होतील.
Comments
Loading…