in , ,

आता रेशनदुकानातही करता येणार पासपोर्ट आणि पॅनकार्डसाठी अर्ज

सर्वसामान्य लोकांना प्रत्येक सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने मोठी पावले उचलताना दिसत आहे. अशात आता रेशन दुकानांना कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये बदलण्याची तयारी केली जात आहे. स्वस्त धान्य दुकानांतून वीज, पाणी व अन्य सुविधांची बिले भरण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय या दुकानांतून पॅन क्रमांक व पासपोर्टचे अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली जाणार असून, निवडणूक आयोगाशी संबंधित सेवाही उपलब्ध होणार आहेत.

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड सोबत करार केला आहे. यामुळे रेशन दुकानांचे उत्पन्न वाढेल. रेशन घेण्याव्यतिरिक्त, लोक या दुकानांद्वारे पॅन कार्ड आणि पासपोर्टसाठी अर्ज करू शकतील. एवढेच नव्हे तर वीज आणि पाण्याचे बिलही येथे जमा करता येते. या सामंजस्य करारावर सार्वजनिक पुरवठा उपसचिव ज्योत्स्ना गुप्ता आणि सीएससीचे उपाध्यक्ष सार्थिक सचदेव यांनी स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी अन्न व पुरवठा सचिव सुधांशू पांडेय आणि सीएससीचे दिनेशकुमार त्यागी यांची उपस्थिती होती.

अन्न मंत्रालयाच्या या निर्णयामुळे, सीएससी सेवांचा पुरवठा रास्त भाव दुकान विक्रेत्यांमार्फत केल्याने रेशन दुकानांसाठी व्यवसायाची संधी आणि उत्पन्न वाढेल. अधिकृत निवेदनात म्हटले आहे की रेशन दुकाने सीएससी सेवा केंद्र म्हणून विकसित केली जाऊ शकतात. अशा CSC केंद्रांना त्यांच्या सोयीनुसार अतिरिक्त सेवा निवडण्यास सांगितले जाईल. स्वस्त धान्य दुकानांतून केंद्र सरकारकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यान्वये गरिबांना अत्यल्प दरात अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. या योजनेत ८० कोटी कुटुंबांना सामावून घेण्यात आले आहे. या सर्वांना नव्या सुविधांचा लाभ घेता येईल.

यातून लोकांना सेवा मिळेलच, पण त्याबरोबरच दुकानदारांनाही नवीन व्यवसाय मिळेल. या सुविधांचा सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच उपयोग होणार असून या कामांसाठी करावी लागणारी पायपीट कमी होणार आहे. या सुविधा इतरत्रही उपलब्ध आहेत, यामुळे रेशन दुकानांचे उत्पन्न वाढायलाही मदत होणार आहे. रेशन दुकानातून धान्य खरेदी करतानाच नागरिक पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी अर्जही भरू शकणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रविवारी मध्य रेल्वेचा 10 तास विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

IPL वर पुन्हा कोरोनाच संकट?; ‘या’ संघातील महत्त्वाचा खेळाडू कोरोनाबाधित, संपर्कातील सहा जण विलगीकरणात