in ,

NSA अजित डोवाल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याने चौकशीत एक धक्कादायक माहिती दिली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवद्याने कबूली दिली की, पाकिस्तानी हँडलर्सच्या सांगण्यावरुन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या कार्यालयाची रेकी करण्यात आली होती.

२०१६चा उरी सर्जिकल स्ट्राईक आणि २०१९चा बालाकोट एअर स्ट्राईक भारताने केला तेव्हापासून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. अजित डोवाल हे भारतातील सर्वात सुरक्षित व्यक्तींपैकी एक आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता सुरक्षा यंत्रणा आणि केंद्रीय गृह मंत्रालयाला जागरूक करण्यात आले आहे तसेच त्यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याने दिली कबूली

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, दिल्ली आणि श्रीनगरमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की ६ फेब्रुवारी रोजी जैश दहशतवादी संघटनेच्या हिदायत-उल्लाह मलिक याला अटक करण्यात आली. मलिक याच्या चौकशीत हा मोठा खुलासा झाला आहे. या दहशतवाद्याच्या विरुद्ध जम्मूमधील गंगयाल पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला होता. मलिक याने चौकशीत कबूल केले की, २४ मे २०१९ रोजी आपण श्रीनगरहून दिल्लीला फ्लाईटने आलो होतो. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्या ऑफिसचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मग तो व्हिडिओ पाकिस्तानी हँडलर्सला व्हॉट्सअॅपवर पाठवला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अर्थसंकल्प क्रोनी कॅपिटालिस्ट असल्याचा आरोप तथ्यहीन; अर्थमंत्र्यांनी मोदी सरकारवर साधला निशाणा

निष्काळजीपणाचा कळस : वर्गखोलीची भिंत कोसळल्यामुळे विद्यार्थी जखमी