in ,

Maharashtra Corona;दिलासा! महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा उतरताच…

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग कमी होत असताना आकडेवारीरून दिसून येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णवाढ कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्यासह आरोग्य विभागासाठी दिलासादायक बाब आहे.

राज्यात एकूण 21 लाख 6 हजार 16 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.आज 15 हजार 169 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. 29 हजार 270 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 54 लाख 60 हजार 589 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.54% झाले आहे. त्यामुळे राज्यासाठी हा दिलासा आहे.

मृत्युदरातही घट

 गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 285 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. एका रुग्णाचाही मृत्यू होणं ही दुर्दैवी बाब असली, तरी आठवड्याभरापूर्वीपर्यंत असलेली रोजची 600, 700 किंवा काही दिवशी 800 ते 900 मृतांची आकडेवारी 285 पर्यंत खाली येणं ही देखील काहीशी दिलासादायक बाब ठरली आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Yogi Adityanath | “अमेरिका आणि युरोपपेक्षा उत्तर प्रदेशमध्ये मृत्यूदर कमी”

Pfizer : भारतात लशींच्या पुरवठ्यासाठी बोलणी सुरू – फायझर