in

बेळगावात ओमायक्रॉनचा शिरकाव; नायजेरीयातून आलेला रूग्ण पॉझिटीव्ह

नंदकिशोर गावडे, बेळगाव | बेळगावमध्ये ओमाक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे.नायजेरियातून बेळगावला आलेल्या इसमाला ओमायक्रॉनची लागण झालेली आहे. यानंतर बेळगावची आरोग्य व्यवस्था खडबडून जागी झाली असून संपर्कात आलेल्यांची चाचणी आता सुरु आहे.

बेळगावमध्ये ओमायक्रॉनच्या पहिला रुग्णाचा शिरकाव झाला आहे. या रूग्णाला सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. या घटनेने बेळगावमध्ये आता एकच खळबळ उडाली आहे. सध्या कर्नाटक राज्याचे हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये सुरु असून अनेक मंत्री व आमदार सध्या बेळगावमध्ये आहेत. या ओमायक्रॉनच्या रुग्णामुळे आता अधिवेशनावर सावट पडण्याची शक्यता आहे.यानंतर बेळगावची आरोग्य व्यवस्था खडबडून जागी झाली असून संपर्कात आलेल्यांची चाचणी आता सुरु आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मॅट्रिमोनिअल साईट्सवर लग्न जुळवताय…26 महिलांना घातला कोट्यवधींचा गंडा

Goa Assembly Election : काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर