पडद्यावरचे हीरो हे कसे त्याच्या खऱ्या आयुष्यात झीरो आहेत, हे दाखवण्यासाठी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांचा नेहमी विरोध करू, असे काँग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत होती, तेव्हा हे अभिनेते नेहमी ट्विटरवरुन टीका करत असत; मात्र आज हे नेते गप्प का आहेत, असा प्रश्न उपस्थित करत पटोलेंनी त्यांच्यावर टीका केली होती. मी आज ही माझ्या या वक्तव्यावर ठाम आहे, आणि त्यांचा विरोध करणार, असं त्यांनी म्हटलं आहे.
पेट्रोल डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहेत, यामुळे सर्वसामान्यांचे हाल होतं आहेत. याचं पार्श्नभूमीवर पटोले यांनी टीका केली होती, आणि नंतर त्यावरून घूमजाव केला असा आरोप पटोलेंवर करण्यात येतं होता. मात्र मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या शूटिंग महाराष्ट्र जिथे कुठे चालतील, तिथे काँग्रेसकडून काळे झेंडे दाखवणार, असं त्यांनी पुनरुच्चार केला, यासह राज्यात त्यांचे चित्रपट चालू देणार नाही, असंही त्यांनी म्हटल आहे.
पडद्यावरचे हीरो खऱ्या आयुष्यात झीरो, नाना पटोले यांचे पुन्हा बिग बी, अक्षयवर टीकास्त्र

Comments
Loading…