in

…आणि युवराज सिंगने एकाच षटकात लगावले सहा षटकार!

क्रिकेटर युवराज सिंग ‘२०-२०’ क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारणारा पहिला क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक (१२ चेंडूत) गाठणारा खेळाडू ठरला. युवराजचा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण विक्रम मानला गेला आहे.भारताने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर झालेल्या या वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करताना विजेतेपद पटकावले होते आणि या यशात युवराजची भूमिका महत्त्वाची ठरली होती. भारताचा इंग्लंडविरुद्धचा डर्बन येथील सामन्याची आजही आठवण काढली जाते.

युवराजने टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या विरोधात स्टुअर्ट ब्रॉडच्या ओव्हरमध्ये ६ बॉलमध्ये मारलेले ६ सिक्स कोणीच विसरले नसतील. युवराजच्या या खेळीमुळे भारताने २० ओव्हरमध्ये ४ विकेट गमवत २१८ रन्सचं स्कोर उभा केला आणि इंग्लंडला विजयासाठी २१९ धावांचे आव्हान दिले.सेहवाग (६८) व गंभीरच्या (५८) चौफेर फटकेबाजीमुळे भारताला सणसणीत सलामी मिळाली होती. भारताने इंग्लंडवर १८ धावांनी विजय मिळविला. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो इंग्लिश गोलंदाजांची धुलाई करीत, एकाच षटकात सहा षटकारांची आतषबाजी करणारा युवराज सिंग या कामगिरीसाठी अर्थातच तो सामनावीर ठरला.

युवराजने हे ६ सिक्स रागाच्या भरात मारले होते. युवराज बोलला की, फ्लिंटॉफने त्याच्या शॉट्सला खराब ठरवलं होतं. यावर त्याला ऐवढा राग आला की त्याने फ्लिंटॉफलाच तू खराब असल्याचं म्हणून टाकलं. युवराजने हे उत्तर दिल्यानंतर फ्लिंटॉफने त्याचा गळा कापण्याची भाषा केली. हातात असलेल्या बॅटने देखील मारण्याची भाषा त्यावेळेस फ्लिंटॉफने केली, असा खुलासा युवराज सिंग याने केला आहे. भारताला २००७ मध्ये पहिल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये चॅम्पियन बनविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराजला याच स्पर्धेत ‘सिक्सर किंग’ ही ओळख मिळाली होती आणि हे विजेतेपद त्यानंतर नेहमीसाठी युवीसोबत एका विशेषणाच्या रूपाने जोडले गेले. तो टी-२० मध्ये एकाच षटकात सहा षटकार मारणारा पहिला आणि एकूण चौथा फलंदाज बनला होता.

फ़र्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अशीच कामगिरी रवी शास्त्री आणि गॅरी सोबर्स यांनी केली होती,तर दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्सने ही कामगिरी वर्ल्डकपमध्ये केली होती. मनोरंजक बाब म्हणजे टीम इंडियाचे सध्याचे संचालक रवी शास्त्री त्या षटकाच्या वेळी समालोचन करीत होते. युवराजच्या या कामगिरीमुळेच त्याला ‘सिक्सर किंग’ म्हणून ओळखण्यात येऊ लागले होते. युवराजचा त्या सामन्यातील प्रत्येक षटकार हा गगनचुंबी होता आणि स्टेडियमच्या सीमारेषेच्या खूप दूरवर त्याने षटकार ठोकले होते. युवराज सिंगने एका षटकात सहा षटकार मारले म्हणून त्याला १ कोटी बक्षिस देखील जाहीर केले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सोने-चांदीच्या किंमतीमध्ये घसरण

रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने दोन बनावट फेसबुक पेज