in

नाशिकमध्ये पुन्हा एकदा तेलगीप्रमाणे स्टॅम्प घोटाळा – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. यावेळी अधिवेशन परिसरात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये जो स्टॅम्प घोटाळा झालेला आहे तो तेलगी घोटाळ्याप्रमाणे झाल्याचं हे निदर्शनास आले आहे. अतिशय गंभीर बाब आहे या प्रकरणात मोठ्या प्रमाणात मालमत्ता तयार करण्यात आलेली आहे याप्रकरणी कारवाई झाली पाहिजे कोण सूत्रधार आहे हे लक्षात घेतले पाहिजे यापूर्वीच्या तेलगी घोटाळा हा देखील नाशिकपासून सुरू झालेला आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे.

तेलगीच्या मुद्रांक घोटाळ्याच्या नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा निबंधक कार्यालयात मुद्रांक घोटाळा उघडकीस आला आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील अनेक जागा मालकांचे मुद्रांक परस्पर बदलून स्टॅम्प वेंडर कोट्याधीश झाला.

भास्कर निकम वडील वरल्या नंतर आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर नाव नोंदणी करायला गेल्याने एक धक्कादायक प्रकार समोर आलाय तो म्हणजे एकाच नंबरचे 2 स्टॅम्प पेपर असल्याने पहिलेच त्यांनी जमीन दुसऱ्याच्या नावाने खरेदी झालीये त्या मुळे निकम यांनी पोलीस तक्रार दाखल केलीये मात्र आरोपी स्टॅम्प विंटर अद्याप फरार आहे.

ही केस केवळ देवळा तालुक्यातली असली तरी संपूर्ण जिल्ह्यात याच पद्धतीने अनेक घोटाळे करण्यात आलेत. यात  एक मोठा बडा राजकीय नेता सुद्धा आहे त्याच्या मुद्रांकातही अशाच पद्धतीने फेरफार करून घोटाळा करण्यात आला.  या नेत्याच्या तक्रारीमुळे  इंस्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रार ची पथके आता गुपचूप नाशिक मध्ये तपास करतायेत. जवळपास पन्नास हजाराहून अधिक खरेदीखत मध्ये असा घोटाळा झाल्याची शक्यताये. त्यामुळे स्टॅम्प वेंडर चे लायसन्स रद्द करत मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी धन्यता मानल हे सर्व करताना महसूल यंत्रणा आणि निबंधक कार्यालय यांची मिलीभगत या घोटाळ्याला कारणीभूत ठरतेय. ही एकच पद्धत नाही तर मुद्रांक कार्यालयात मोठ्या प्रमाणात मुद्रांक घोटाळे होत असतात

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चेक बाऊन्स केल्यास होणार कठोर कारवाई

धक्कादायक ! मुंबईतील रेस्टॉरंटमधील १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह