in

One Avighna Park Fire | ‘त्या’ इमारतीत नेमकं काय घडलं?

गजबजलेल्या मुंबई शहराच्या लालबाग परीसरात असलेल्या वन अविघ्न पार्क या इमारतीला चौथ्या लेवलची आग लागली. 19 व्या मजल्यावर आग लागून वाऱ्यामुळे ती साधारण २५व्या मजल्यापर्यंत पोहोचली. करीरोड स्थानकातून सहज दृष्टीस पडणाऱ्या या इमारतीची आजची अवस्था चित्त विचलीत करणारी आहेत. 247 मीटर इतकी उंची असलेल्या या बिल्डिंगचे डिझाइन नियो-मॉडर्न आर्किटेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने केले असून ही इमारत अविघ्न इंडिया लिमिटेडकडून बांधण्यात आली आहे.

2016 मध्ये बांधकामाला मंजुरी

वन अविघ्न पार्क ही इमारत अगदी बांधकाम सुरू होण्याआधी पासूनंच चर्चेत होती. वन अविघ्न पार्कमध्ये 64 मजल्यांचे दोन टॉवर्स बांधायला मुंबई महानगरपालिकेने परवानगी नाकारली होती. मात्र नंतर पालिकेने 61 मजल्यांच्या टॉवर्सला मंजुरी दिली. 2016ला या इमारतीचे बांधकामाला मंजुरी मिळाली होती. 2019 मध्ये वन अविघ्न पार्क हा प्रकल्प पूर्ण झाला होता. या प्रकल्पात एकूण 208 फ्लॅटस असून, यातल्या 3, 4 आणि 5 बीएचकेच्या फ्लॅट्सची किंमत कोटींमध्ये आहे. 31.84 हजार रुपये प्रति स्क्वेअर फिट अशी असे या घरांचे दर आहेत.

नेमकं काय घडलं?

आज सकाळी ११.५१च्या सुमाराला या टोलेजंग इमारतीमध्ये अज्ञात कारणामुळे आग लागली. सुरवातीला १९व्या मजल्यावर लागलेली ही आग प्रचंड वाऱ्याच्या झोतामुळे परसत गेली. अग्निशमन दलाच्या 15 गाड्यांना ही आग नियंत्रणात आणण्यात यश आलं खरं, पण दुर्दैवाने यत एक व्यक्ति दिवंगत झाली आहे. जीव वाचवण्यासाठी बाल्कनीत लटकलेले अरूण तिवारी यांचा हात सुटल्याने १९व्या मजल्यावरून कोसळून त्यांचा मृत्यु झाला.

फर्नीचरचं कामात बिघाड होउन एका ठिणगीमुळे ही आग लागल्याते प्राथमीक अंदाज आहेत. रहिवाशांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना दिलेल्या माहिती नुसार या ईमारतीचे फायर प्रोटेक्शन सिस्टमचे मेंटेनन्स केलेले नव्हते. ‘दोशींवर कारवाई करणार’ अशी ग्वाही महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडूंची केंद्रावर शाब्दिक टीका

परिणीती चोप्रा वाढदिवस पाहा खास फोटो