in

One Avighna Park Fire | अविघ्नच्या सुरक्षा रक्षकांची LOKशाहीच्या प्रतिनिधीशी अरेरावी

लालबाग परिसरामधील वन अविघ्न पार्क या आलिशान इमारतीला आज दुपारी १२ च्या सुमारास भीषण आग लागली. लालबागमधील सर्वात उंच इमारतींपैकी एक असणारी ही इमारत ६० मजल्यांची असून १९ व्या मजल्यावर आग लागली आहे. या आगीच्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. आगीपासून वाचण्याचा प्रयत्न करत असताना खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. मात्र यावेळी घटनेची माहिती मिळवत असताना अविघ्नच्या सुरक्षा रक्षकांनी LOKशाहीच्या प्रतिनिधीशी अरेरावी तसेच ध्काकाबोकी करण्याचा प्रकार समोर आला आहे. सदर घटनेत वार्तांकन करताना अरेरावी केली असून कॅमेरामनला घटनास्थळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

करीरोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारतीमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. 19 व्या मजल्यावर आग लागल्यानंतर दुरुन आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत होता. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आग नेमकी कुठल्या कारणामुळे लागली, ती कशी पसरली, याविषयी माहिती अद्याप समोर आलेलं नाही.


What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Petrol Diesel Rate Today | जाणून घ्या आजचे इंधन दर

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडूंची केंद्रावर शाब्दिक टीका