in

ठेकेदाराची एक चूक अन् शेतकऱ्याचं दोन लाखांचं नुकसान

वाशिम | अकोला- मंगरुळपीर एन एच 61 या सिमेंट रोडचे काम पूर्ण झाले आहे. मात्र ठेकेदाराने रोडच्या साईट च्या नाल्या काढल्या नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन नुकसान होत आहे. मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा येथिल शेतकरी प्रकाश राऊत यांच्या शेतात पाणी शिरल्याने शेतातील सुपीक मातीही खरडुन गेली असुन झाडाच्या मुळ उघडे पडले आहेत. दीड एकर पपई फळबागेचे दोन लाखांचं नुकसान झाले आहे.

सिमेंट रोडचे काम सुरू असताना रोडच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ठेकेदाराने धुरे व आऊटलेट दुरुस्त केले नाही. त्यामुळे शेतात पाणी जाऊन पपई फळबागेचे नुकसान झाले आहे. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग अभियंता तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन नुकसान भरपाई ची मागणी केली मात्र अजून कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळं जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकरी प्रकाश राऊत यांनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mira Road

आज दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, ठाण्यात अँटिजेन टेस्ट बंधनकारक