देशातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाने पुन्हा उसळी घेतल्यानंतर आता दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, केरळ आणि पंजाबमधील नागरिकांना कोरोना नेगेटिव्ह अहवाल असेल तरच दिल्लीत प्रवेश मिळेल. दिल्लीत प्रवेश करण्यापूर्वी या पाच राज्यांतील नागरिकांना RT-PCR अहवाल सादर करावा लागेल. 27 फेब्रुवारीपासून या नियमाची अंमलबजावणी होणार असून 15 मार्चपर्यंत तो लागू राहील.
देशातील 11 राज्यांमध्ये मंगळवारी कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 6,218 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मुंबई, पुणे, ठाणे, अमरावती आणि नागपूरमध्ये कोरोना प्रसाराचा वेग सर्वाधिक आहे. कोरोनाच्या तीन लाटांमधून बाहेर पडलेल्या दिल्लीत पुन्हा करोना बळावू नये, यासाठी केजरीवाल सरकारनं विषाणूला वेशीवर रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्यात आहेत.
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6 हजार नवे रुग्ण
मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे 6218 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तसेच, 5869 कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.96 टक्क्यांवर आहे. तर दिवसभरात 51 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.45 टक्क्यांवर आहे. अशाच प्रकारे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली, तर आगामी काळात हा मृत्यूदर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 लाख 12 हजार 312 वर पोहोचला आहे. काल राज्यात 5 हजार 210 कोरोनारुग्णांची नोंद झाली होती. तर काल दिवसभरात 18 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता.
Comments
Loading…