मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यात भाजपाला पुन्हा एकदा अपयश आले आहे. हे पद काँग्रेसकडेच राहील, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपामध्ये वितुष्ट आले. राज्यात विरोधी बाकांवर असलेल्या भाजपाने संख्याबळाच्या आधारावर मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावरही दावा केला होता. मात्र महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा दावा फेटाळला. काँग्रेसकडे आधीपासूनच विरोधी पक्षनेतेपद असल्याचे सांगत तसेच पालिकेच्या नियमांच्या आधारावर महापौर पेडणेकर यांनी भाजपाचा विरोधी पक्षनेतेपदावरील दावा फेटाळून लावला होता.
महापौर पेडणेकर यांनी मनमानी निर्णय घेत हा दावा फेटाळून लावल्यााचा आरोप करत भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. भाजपाकडून प्रभाकर शिंदे यांच्याच नावाची शिफरस करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यानंतर शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तिथेही त्यांच्या पदरी निराशाच आली.
Comments
Loading…