in

त्रिसदस्यीय प्रभाग समितीला कॉंग्रेसच्या काही नेत्यांचा विरोध, संपूर्ण पक्षाचा विरोध नाही – अजित पवार

बंगाल उपसागरातल्या गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी, पुरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेले जलसंपदामंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. उस्मानाबाद जिल्ह्यात पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल पूरग्रस्त मराठवाड्यात पाठवण्यात आले असल्याचेही त्यांना सांगितले. दरम्यान याच वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद घेऊन पूरग्रस्तांना पीकविम्याचे पैसे मिळावेत म्हणून राज्य सरकार प्रयत्नशील असे यावेळी म्हटलं आहे.

राज्य व जिल्ह्यांच्या आपत्कालिन मदत यंत्रणांनी सतर्क आणि परस्परांच्या संपर्कात राहून आपत्तीग्रस्तांसाठी बचाव व मदतकार्य तात्काळ सुरु करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हा आपत्कालिन मदत यंत्रणांना दिल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी पोहोचता येणार नाही त्या ठिकाणी ड्रोनने सर्वे करण्याच्या सूचना देण्यात आले आहे

याचबरोबर आगामी 18 पालिका निवडणुकीसाठी (Municipal Corporation elections ) प्रभागाऐवजी एक सदस्यीय वार्ड पद्धत जाहीर केली होती. पण आता मुंबई (mumbai) वगळता इतर महापालिका निवडणुकीसाठी (Corporation elections) तीनचा प्रभाग करण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात ही अजित पवार यांनी त्रिसदस्यीय प्रभाग समितीला कॉंग्रेसच्या काही नेत्यांचा विरोध, संपूर्ण पक्षाचा विरोध नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

BIGG BOSS मराठीतून ‘ही’ प्रसिद्ध स्पर्धक घराबाहेर, जाणुन घ्या कारण

आनंदराव अडसूळ यांची न्यायालयात धाव