in

‘मुलांबरोबर ओरल सेक्स गंभीर गुन्हा नाही’ अलाहबाद हायकोर्टाचा धक्कादायक निर्णय

अलाबाहाबाद उच्च न्यायालयाने १० वर्षांच्या अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपीची शिक्षा कमी करत धक्कादायक निर्णय़ दिला आहे. लहान मुलांसोबत ओरल सेक्स करणं पॉक्सो कायद्यातील तरतुदींनुसार गंभीर लैंगिक अत्याचार किंवा लैंगिक अत्याचार श्रेणीत येत नसल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे. यावेळी कोर्टाने आरोपीची शिक्षा १० वर्षांहून सात वर्ष केली.

आरोपीने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती अनिल कुमार ओझा यांनी सांगितलं की, “पॉक्सो कायद्यातील तरतुदींनुसार आरोपीने केलेला गुम्हा कलम ५/६ किंवा ९ (एम) यामध्ये मोडत नसल्याचं स्पष्ट आहे. गुप्तांग तोंडात देणं हा गंभीर लैंगिक अत्याचार किंवा लैंगिक अत्याचार श्रेणीत येत नाही. हा गुन्हा पॉक्सो कायद्यातील कलम ४ अंतर्गत शिक्षेस पात्र आहे”.

२०१८ मध्ये झाशीमधील कोर्टाने आरोपीने पॉक्सो कायद्यातील कलम ६ आणि इतर कलमांतर्गत दोषी ठरवत १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. ही घटना २२ मार्च २०१६ रोजी घडली होती. १० वर्षीय पीडित मुलाच्या वडिलांनी केलेल्या आरोपांनुसार, आरोपीने झाशीमधील आपल्या घऱी येऊन मुलाला जवळच्या मंदिरात नेलं होतं. तिथे गेल्यावर २० रुपये देत आपल्यासोबत ओरल सेक्स करण्यात सांगितलं होतं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गौतम गंभीरला ‘ISIS काश्मीर’कडून जीवे मारण्याची धमकी

‘जर्सी’ची स्क्रिप्ट वाचल्यानंतर शाहिद ला अश्रू अनावर