in

Oscar 2022 | ‘शेरनी’ की ‘सरदार उधम’ कोण मारणार बाजी?

दरवर्षी ऑस्कर ( Oscar 2022) पुरस्कारासाठी भारतीय सिनेमांची निवड केली जाते. पुढील वर्षी 27 मार्च 2022 मध्ये ऑस्कर सोहळा (94th Academy Awards) रंगणार आहे. त्याआधी पुढील वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारतीय सिनेमाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी या प्रक्रियेअंतर्गत 14 सिनेमांची निवड करण्यात आली आहे. यापैकी एक सिनेमा ऑस्करला पाठवण्यात येणार आहे.

शॉर्टलिस्ट झालेल्या 14 सिनेमांमध्ये विद्या बालनचा ‘शेरनी’ (Sherni ) आणि विकी कौशलचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘सरदार उधम’ (Sardar Udham) या दोन चित्रपटांही समावेश आहे. शाजी एन. करन यांच्या अध्यक्षतेखालील फिल्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या 15 सदस्यांची ज्युरी ऑस्करच्या बेस्ट फॉरेन लँग्वेज कॅटेगिरीसाठी एका सिनेमाची निवड करणार आहेत.

ज्युरी हे सर्व शॉर्टलिस्ट केलेले सर्व 14 सिनेमे पाहतील आणि यापैकी सर्वोत्तम चित्रपट भारताकडून अधिकृत एन्ट्री म्हणून ऑस्करवारीला (India’s official entry to Oscars 2022) जाईल. ऑस्करवारीसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या 14 चित्रपटांमध्ये ‘शेरनी’ व ‘सरदार उधम’ या हिंदी चित्रपटांशिवाय ‘नायटू’ (मल्याळम ), मंडेला (तामिळ) या चित्रपटांचा समावेश आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वायुसेनेच्या विमानाचा अपघात

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार!