in

उस्मानाबादेत विजयादशमी निमित्त साकारली 289 चौरस फुट रांगोळी

बालाजी सुरवसे, उस्मानाबाद | उस्मानाबाद शहरात विजयादशमी निमित्त 289 चौरस फुटांची रांगोळी साकारण्यात आली आहे. 12 तासाच्या कालावधीत ही रांगोळी साकारली असून यासाठी 40 किलो रंगीत रांगोळीचा वापर करण्यात आला.

धाराशिव मर्दिनी मंदिरामध्ये शहरातील रामराज्य प्रतिष्ठान यांच्या मार्फत 289 चौरस फुटांची रांगोळी साकारण्यात आली. कलायोगी आर्ट उस्मानाबादच्या टिमने 40 किलो रंगीत रांगोळी वापर करत 12 तासाच्या कालावधीत विजयादशमीच्या शुभेच्छा पर रांगोळी साकरण्यात आलीय.ही रांगोळी कलायोगी आर्ट्स चे संचालक राजकुमार कुंभार यांच्या मार्गदर्शनात साकारण्यात आली असून त्यासाठी स्वप्नील कुंभार, दीपराज भोकरे,समृद्धी कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.या रांगोळी मंदीरात येणाऱ्या भाविकांसाठी एक आकर्षण ठरत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लातूरात एमआयएमला खिंडार, 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

भिवंडी पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या नमिता गुरव बिनविरोध