in

अन्यथा पुन्हा लॉकडाऊन, छगन भुजबळांचा इशारा

नागरिकांनी निर्बंध पाळले नाहीत, तर पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिककरांना दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मंदिरे सुरू करायला शासनाने परवानगी दिली आहे. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरली. तिसऱ्या लाटेची चिंता नाही, असे भाकित वर्तवण्यात येत आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातले येवला, सिन्नर आणि निफाडमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत.

याबद्दल लासलगाव येथे आलेले पालकमंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले, जिल्ह्यातील काही भागामध्ये रुग्णवाढ होत आहे. नागरिकांनी निर्बंध पाळले नाहीत, तर पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येईल. दुकाने बंद करण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिर्डी विमानसेवा आजपासून सुरू,साईभक्तांनी केले आनंद व्यक्त

Maharashtra Corona | राज्यात २ हजार २९४ नवे बाधित