गेल्या 21 दिवसांपासून आझाद मैदानात विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल सुद्धा अद्याप राज्य सरकारने घेतली आहे. त्यात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनस्थळी शिक्षकांची भेट घेतली. यावेळी अधिवेशनात शिक्षकांचा प्रश्न लावून धरणार, अन्यथा अधिवेश होऊ देणार नाही असा थेट इशारा फडणवीस यांनी दिला.
मुंबईत आझाद मैदानात २९ जानेवारीपासून शिक्षकांचं आंदोलन सुरु आहे. २० टक्के अनुदान प्रतिवर्षी देऊ असं सांगितलं मात्र २ वर्ष झाली तरी त्यांना हे अनुदान मिळालेलं नाही. त्यावेळी सरकारच्या संवेदना बधीर झाल्या आहेत असा टोला फडणवीस यांनी लगावला.
Comments
Loading…