in

संतापाचा उद्रेक ! शेतकऱ्यांनी केला भाजपा आमदारावर हल्ला

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहे. मागील कित्येक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू असून, शेतकऱ्यांच्या संतापाचा आता कडेलोट होत असल्याचं दिसत आहे. शेतकऱ्यांच्या एका गटाने भाजपा आमदारावर हल्ला केला.

तीन कृषी कायद्यांना घेऊन पंजाबमधील भाजपा नेते शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करताना दिसत आहे. अबोरचे आमदार अरुण नारंग हे शनिवारी स्थानिक नेत्यांसह मलोतमध्ये पत्रकार परिषदेसाठी आले होते. त्यावेळी त्यांना आंदोलक शेतकऱ्यांनी घेराव घातला. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी त्यांच्या दिशने शाही फेकली. मात्र, थोड्या वेळाने आमदार नारंग आणि भाजपा कार्यकर्ते बाहेर आल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आमदार यांचे कपडेही फाडले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना शनिवारी घडली आहे.

या घटनेनंतर पीटीआयशी बोलताना आमदार नारंग म्हणाले, “मी मलोतमध्ये पत्रकार परिषद घेण्यासाठी गेलो होतो, मात्र शेतकऱ्यांनी परवानगी दिली नाही. शेतकरी आक्रमक झाले आणि मला वेढा दिला. मला काही शेतकऱ्यांनी धक्के मारले. त्याचबरोबर माझे कपडेही फाडण्यात आले,” असं नारंग यांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्र पुन्हा लॉकडाउनच्या उंबरठयावर? प्रशासकीय नियोजनाचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Rafale | भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार; 10 राफेल विमानं येणार ताफ्यात