in ,

भारताचा चुकीचा नकाशा दाखविणाऱ्या अमेरिकन फ्रीडम हाऊसबद्दल तीव्र संताप

अमेरिकन थिंक टँक ‘फ्रीडम हाऊस’ने एक अहवाल जारी केला आहे. या अहवालात भारतातील हक्क आणि नागरी स्वातंत्र्याबद्दलचे निष्कर्ष नोंदविण्यात आले आहेत. या संस्थेने या अहवालासोबत दिलेला भारताचा नकाशा चुकीचा असल्याने अहलावालबरोबरच या नकाशावरूनही तीव्र पडसाद उमटले आहे.

फ्रीडम हाऊस ही जागतिक स्तरावरील संस्था असून लोकशाही मूल्ये आणि नागरी स्वातंत्र्य यानुसार जगातील देशांना ही संस्था क्रमवारी देते. या संस्थेला अमेरिका सरकारकडून आर्थिक सहाय्य दिले जाते. मोदी सरकारच्या कारकीर्दीत भारतातील वातावरण ‘मुक्त’पासून ‘अंशत: मुक्त’ अशा स्थितीपर्यंत आले असल्याचे फ्रीडम हाऊसने आपल्या अहवालात म्हटले आहे. तसेच, मोदी सरकारच्या काळात भारतातील हक्क आणि नागरी स्वातंत्र्याचा ऱ्हास सुरू झाल्याचा दावाही या संस्थेने केला आहे. या अहवालावरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे, भाजपाने या अहवालातील निष्कर्ष फेटाळून लावले आहेत. हा अहवाल भारतविरोधी कटाचाच भाग असल्याचे भाजपाने म्हटले आहे.

याबरोबरच या संस्थेने भारताचा चुकीचा नकाशा ट्विटरवर प्रसिद्ध केला आहे. या नकाशामध्ये जम्मू-काश्मीरचा भाग भारतामध्ये दाखविण्यात आलेला नाही. त्यामुळे या संस्थेवर तसेच ट्विटरवर कारवाई करण्याची मागणी भारतीयांकडून होत आहे. अशा प्रकारचा फुटीरतावादी अजेंडा राबविण्याला पायबंद घालण्याची गरज असल्याचे भारतीयांचे म्हणणे आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

धक्कादायक ! मुंबईतील रेस्टॉरंटमधील १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

मोदी सत्तेत आल्यापासून भारतातील स्वातंत्र्य कमी झाले; ‘ग्लोबल फ्रीडम’चा अहवाल