in ,

वाढत्या कोरोना रुग्णांची चिंता : मुंबईतील ओव्हल मैदान आज सायंकाळपासून बंद

कोरना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. मुंबईसह राज्यात लॉकडाऊन लागू केलेले नसले तरी राज्याच्या अनेक भागात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईतही काल (बुधवारी) कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या पुढे गेल्याने मुंबई पालिकेची चिंता वाढली आहे. त्यामुळेच मुंबईतील एक महत्त्वाचे मैदान उद्यापासून बंद ठेवण्याचा नि्र्णय पालिकेने घेतला.

मुंबई महापालिकेने ओव्हल मैदान पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या मैदानावर कोणत्याही प्रकारचा खेळ किंवा इतर गोष्टींसाठी परवानगी दिली जाणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

का वाढत आहेत रुग्ण?
सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याद्वारे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचा संशय आहे. पण त्याचबरोबर 1 फेब्रुवारीपासून लोकलसेवा सर्वांसाठी (काही काळासाठी) सुरू केल्या, हेही एक कारण असल्याचे खुद्द पालिकेचे म्हणणे आहे. मोठया प्रमाणात मुंबईकर लोकलमधून प्रवास करीत आहेत. त्यामुळे रुग्णवाढीचा लोकलशी संबंध असू शकतो, असे मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पोलीस महासंचालक म्हणतात, पूजा चव्हाण प्रकरणात फार काही बोलता येणार नाही, पण…

नीरव मोदीला भारताच्या ताब्यात देण्याचा इंग्लडच्या न्यायालयाचा आदेश