in ,

महाबळेश्वर रस्त्यावर केळघर घाटात दरड कोसळली

साताऱ्यात पडत असलेल्या संततधार पावसामुळे आज सकाळी केळघर घाटातील दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. जेसबीच्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू असून रस्त्यावर दरडीचे दगड आल्याने महाबळेश्वर-सातारा रस्त्यावर वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वर ते तापोळा दरम्यानच्या रस्त्यावर दरड कोसळली आहे. आज पहाटे २ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद असून वीजपुरवठा ही खंडित झाला आहे .केळघर परिसरात पावसाचे पाणी शेतात घुसल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. केळघर पुलाचे काम पूर्ण न झाल्याने पावसाचे पाणी शेतात घुसल्याने शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोल्हापूरची पंचगंगा नदी पात्र बाहेर

WTC Final 2021 | आजपासून सुरु होणार Ind Vs Nz अंतिम सामना