in

बासमती तांदूळ पाकिस्तानचा… युरोपीय संघाचा दावा!

लोकशाही न्यूज नेटवर्क

युरोपीय संघामध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. बासमती तांदळाची नोंदणी पाकिस्तानी तांदूळ म्हणून व्हावी, यासाठी पाकिस्तानकडून भारताविरोधात २७ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. तसेच युरोपीय संघामध्ये यामार्फत दावा दाखल करण्यात आला होता. त्यावर पाकिस्तानला बासमतीचा ‘जीआय टॅग’ मिळाला आहे. त्यानुसार यापुढे बासमती तांदुळचे मूळ स्थान पाकिस्तान असणार आहे.
पाकिस्तानचे आर्थिक सल्लागार अब्दुल रझाक दाऊद यांनी ट्विट करून ‘जीआय टॅग’ मिळाल्याची माहिती दिली.

बासमती तांदळाच्या जगप्रसिद्ध जातीचा भौगोलिक निदर्शक शिक्का म्हणजे जीआय टॅग असतो. मात्र आता तो पाकिस्तानला मिळाल्याने बासमती तांदळाचे मूळ स्थान पाकिस्तान संबोधले जाणार आहे. बासमतीची नोंदणी पाकिस्तानी तांदूळ म्हणून व्हावी, यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील होता. यावर भारताने बासमती तांदूळ फक्त भारतातच पिकवला जातो, असा दावा केला होता. मात्र, हा दावा युरोपीयन समुदायाने फेटाळून लावला आहे. पाकिस्तानातून जवळपास 7 लाख क्विंटल तांदळाची निर्यात होते. तर अडीच लाख तांदळाची निर्यात युरोपीय संघातील देशांमध्ये केली जाते.

जीआय टॅग म्हणजे काय?
विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील मूळ पदार्थांना, पिकांना त्या प्रदेशाची ओळख मिळण्यासाठी भौगोलिक निदर्शक शिक्का दिला जातो. याची नोंदणी आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यात येते.

भारताच्या व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे का?
उत्पादाकांच्या मते ग्राहक विशिष्ट प्रकारचा तांदुळ घेताना गुणवत्ता बघूनच घेतात. त्यामुळे भारतावर किंवा कोणत्याही देशांच्या व्यापारावर त्याचा परिणाम होणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. आता भारताला युरोपीय समुदायात धक्का बसला असला, तरी यामुळे भारताच्या व्यापारावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे उत्पादकांनी सांगितले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईकरांना आता नो पार्किंगमध्येही गाडी पार्क करता येणार

पहिल्या स्वदेशी आणि विनाचालक मेट्रो ट्रेनचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण