in

पालघरच्या मच्छीमाराचं नशीब फळफळलं; घोळ माशाने बनवले कोट्यधीश

नमित पाटील | पालघर जिल्ह्यातील मच्छीमाराचे नशीब एकाच रात्री बदलले आहे. या मच्छीमाराने टाकलेल्या जाळ्यात एकूण 157 घोळ आणि दाढे मासे सापडल्याने त्यांचे नशीब फळफळले.एका व्यापाराने हे मासे तब्बल 1 कोटी 25 लाख रुपयांची बोली लावून खरेदी केले आहेत. त्यामुळे ही माशाची खरेदी चर्चेत आली आहे.

   मुरबे येथील हरबा देवी या बोटीचे मालक चंद्रकांत तरे व त्यांचे बोटीवरील सहकारी यांना मासेमारी व्यवसायानेन करोडपती बनवलय. पालघर तालुक्यातील मुरबे येथील चंद्रकांत तरे आणि त्याचे अन्य आठ सहकारी आपली हरबा देवी बोट घेऊन 28 ऑगस्ट रोजी मासेमारीसाठी रवाना झाले होते. डहाणू-वाढवण येथील समुद्रात साधारणपणे 20 ते 25 नॉटिकल समुद्रात हरबा देवी बोटीतून समुद्रात त्यांनी मासेमारीसाठी  टाकलेल्या जाळ्यात एकूण 157 घोळ आणि दाढे मासे सापडल्याने त्यांचे नशीब फळफळले. प्रत्येकी सुमारे 12 किलो ते 25 किलो वजनाचे हे घोळ मासे असल्याचे कळते.

      घोळ माशाच्या पिशवीला ( बोथ ) ही मोठी मागणी असून नर घोळ माश्याच्या पोटात असलेल्या बोथ (पिशवी) माद्यांच्या पिशवीपेक्षा जास्त दर्जेदार असतात. त्यामुळे नर जातीच्या बोथाला व्यापाऱ्यांकडून मोठी किंमत मिळते.  या माशाचे मास व बोथ यांची विक्री करताना एका व्यापाराने हे मासे तब्बल 1 कोटी 25 लाख रुपयांची बोली लावून खरेदी केले आहेत. त्यामुळे ही माशाची खरेदी चर्चेत आली आहे.

   घोळ माश्याच्या पिशवीचा (बोथ) उपयोग म्हणजे त्यांच्यापासून शस्त्रक्रियेत वापरले जाणारे सुचर्स किंवा धागे हे जखम शिवण्यासाठी वापरले जातात.त्याचप्रमाणे सौंदर्यप्रसाधने, औषधे बनविण्यासाठी देखील याचा वापर करण्यात येत असल्याचे सांगितले जाते. हॉंगकाँग, मलेशिया, थायलंड, चीन आदी देशात या घोळ माश्याच्या बोथाला मोठी किंमत मिळते.

What do you think?

-5 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Yeu Kashi Tashi Mi Nandayla|’या’ मालिकेत प्रिया मराठे झळकणार

Tokyo Paralympics मध्ये भारताला एकाच स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदक