in ,

Pamela Goswami Drugs | ड्रग्ज प्रकरणात भाजपा नेत्यासह दोन्ही मुलांना अटक

पामेला गोस्वामी ड्रग्ज प्रकरणात कोलकाता पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजपा नेते राकेश सिंह यांना अटक केली आहे. राकेश सिंह यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांनाही अटक करण्यात आली असून, पश्चिम बंगालमधील पूर्बा वर्धमान जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली.

भाजपा युवा मोर्चाची कार्यकर्ता पामेला गोस्वामी हिला पोलिसांनी कोकेन आणि १० लाख रुपयांसह पकडले होते. नोटीस बजावल्यानंतर राकेश सिंह यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पोलिसांच्या नोटिशीला स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर पोलीस राकेश सिंह यांच्या घरी पोहोचले. यावेळी पोलीस आणि राकेश सिंह यांच्या मुलामध्ये बाचाबाची झाली.

कोलकाता पोलिसांनी त्यानंतर घराची झाडाझडती घेतली. राकेश सिंह यांना नोटीस बजावण्यात आली. त्यांना ४ वाजेपर्यंत हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ते बंगालमधून फरार होण्याच्या प्रयत्नात असल्याच्या माहितीनंतर कोलकाता पोलिसांनी राकेश सिंह यांना पूर्व वर्धमान जिल्ह्यात अटक केली. त्याचबरोबर पोलिसांच्या कारवाई व्यत्यय आणल्याबद्दल राकेस सिंह यांच्या दोन्ही मुलानांही अटक करण्यात आली आहे. त्यांच्या मुलांना राहत्या घरी पोलिसांनी ताब्यात घेतलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिर्डीत साईबाबादर्शनासाठी नवीन नियमावली, ‘या’ वेळेत मिळणार दर्शन

परिस्थिती बिघडली तर मुंबईत पुन्हा लॉकडाउन – पालकमंत्री अस्लम शेख