in

ठाकरे सरकारचे मंत्रीच बेशिस्त इतरांना काय शिस्त लावणार ? पंकजा मुंडेंचा सवाल

जळगावमधील वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचवायला लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त करत, ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनाच शिस्त नाही, ते इतरांना काय शिस्त लावणार? असा संतप्त सवाल केल आहे.

बीड जिल्हा सहकारी बँक, महिलांवरील अत्याचार आणि जळगावमधील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महिलांवरील अत्याचार वाढत असून त्यावर सरकारकडून काहीही कारवाई होत नसल्याची तक्रार राज्यापालांकडे केली. जळगावातील घटनेने महिलांवरील अत्याचाराचं प्रकरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे.या प्रकरणात पोलीस अधिकारीच गुन्हेगार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. राज्यात चाललंय तरी काय? असा सवाल देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी केला.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर बीड जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक रोखण्यात आली आहे. कोरोनाच्या नावाखाली बँकेवर प्रशासक नेमण्याचा डाव आखला जात आहे. राज्यपाल या प्राधिकरणाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे याबाबतची तक्रार करण्यात आल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे अन् चीन दिसला की पळे, उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात

मुंबईच्या ब्लॅक आऊटमध्ये 8 जीबीचा डाटा चोरीला